Refinery in Konkan : कोकणातील रिफायनरीसाठी जागा जवळपास निश्चित?, उद्योगमंत्र्यांकडून मोर्चेबांधणी
राजापूरमध्ये रिफायनरी प्रकल्पासाठी जागा जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय. या प्रकल्पासाठी साडेपाच हजार एकर जागेची आवश्यकता आहे. त्यापैकी २९०० एकर जागेसाठी संमतीपत्रं मिळाल्याची माहिती मिळतेय. बारसू, धोपेश्वर, पन्हळे, गोवळ, नाटे, वाडा तिवरे आणि वाडा पन्हेरे या गावात मोठ्या प्रमाणात संमतीपत्र मिळाल्याचं सांगण्यात येतंय.