Ratnagiri Refinery Protest Heat Stroke ; रिफायनरी विरोधातील आंदोलनातील एका महिलेला उष्माघाताचा त्रास
बारसू-सोलगाव रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरू होणार आहे, त्याला अनेक स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. बारसूच्या माळरानावर रिफायनरी विरोधक हजारोंच्या संख्येनं जमले आहेत.. रिफायनरी प्रकल्प आणि सरकारविरोधात ते घोषणा देतायेत. बेमुदत आंदोलन करण्याच्या तयारीनंच हे विरोधाक आले आहेत असं दिसतंय.. कारण जीवनावश्यक वस्तू ते सोबत घेऊन आले आहेत.
रिफायनरी विरोधातील आंदोलनातील एका महिलेला उष्माघाताचा त्रास सुरू झाला... आजूबाजूच्या महिलांनी आणि ग्रामस्थांनी महिलेला रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न मात्र महिलेचा रुग्णालयात जाण्यास नकार दिला.. जीव गेला तरी चालेल पण रुग्णालयात जाणार नाही असा पवित्रा या महिलेनं घेतला...