Nashik Rain Update : नाशकात मुसळधार पाऊस , गोदापात्रातील वाहनं वाहून गेली : ABP Majha
Nashik Rain Update : मुसळधार पावसानं नाशिकला (Nashik Rain) अक्षरशः झोडपून काढलं आहे. संध्याकाळनंतर आलेल्या पावसानं गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. अशातच नाशिकच्या त्रंबकेश्वरमध्ये धबधबा पाहण्यासाठी गेलेले काही पर्यटक अडकून पडले. शर्थीच्या पर्यत्नांनंतर मध्यरात्री 17 पर्यटकांची सुटका करण्यात यश आलं असून अद्याप एक पर्यटक बेपत्ता आहे.