Rajan Salvi Shiv Sena UBT : ठाकरेंना मोठा धक्का बसणार? राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत

Continues below advertisement

Rajan Salvi: राजापूरचे विधानसभा मतदारसंघाचे (Rajapur Vidhan Sabha) माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) शिवसेना ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यास कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याने राजन साळवी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. शिवाय, कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची राजन साळवी यांना चिंता आहे.  त्यामुळे महिनाभरात राजन साळवी याबाबत निर्णय घेणार आहेत. राजन साळवी भाजप की शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार याबाबत सध्या चर्चांना उधाण आले आहे. 

2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवींचा पराभव-

राजापूर विधानसभा मतदारसंघात (Rajapur Vidhan Sabha) शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत (Kiran Samant) यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांनी बहुमताने राजापुरात विजय मिळवला आहे. तर किरण सामंत यांच्या विरुद्ध उभे राहिलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या राजन साळवी यांचा पराभव झाला आहे. चौथ्यांदा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, मात्र 2024 च्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram