BJP : भाजपची रणनीती आखण्यास सुरुवात, आमदार रवींद्र चव्हाण यांना कोकणाची जबाबदारी

कोकणात आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपनं रणनीती आखण्यास सुरुवात केलीये.. याचा महत्त्वाचा भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना कोकणाची जबाबदारी दिल्याचं समजतंय. कोकणातील भाजप नेत्यांही या बातमीला दुजोरा दिला आहे. कोकणात पक्षबांधणी करणे आणि आणि रणनीती ठरवणे या दोन प्रमुख जबाबदाऱ्या चव्हाणांवर दिल्याचं समजतंय. यामागे दोन मोठी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे आंगणेवाडी येथील भाजपची सभा चव्हाणांनी यशस्वी करून दाखवली. दुसरं कारण म्हणजे रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले मानले जातात.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola