Maharashtra Budget : अर्थसंकल्पाकडे गृहिणींचं लक्ष; रत्नागिरीतील महिलांची काय अपेक्षा ?
Maharashtra Budget : अर्थसंकल्पाकडे गृहिणींचं लक्ष; रत्नागिरीतील महिलांची काय अपेक्षा ? राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल. यावेळी विविध घटकांच्या सरकारकडून स्वाभाविकपणे अपेक्षा असणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे असेल. दरम्यान गृहिणी देखील या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून असणार आहेत. त्या अर्थसंकल्पातून गृहिणींना नेमक्या काय अपेक्षा आहेत? याबाबत कोकणातील महिला आणि गृहिणी यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधीनी...
हेही वाचा:
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या राष्ट्रवादी (अजत पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपाने आतापासूनच जपून पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, महिला आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी महायुतीकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्ये प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना लागू केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ही योजना महाराष्ट्रात लागू झाल्यास राज्याच्या तिजोरीवर वर्षाला साधारण 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा भार पडेल.
महाराष्ट्रात लवकरच लाडकी बहीण योजना? (Ladli Behna Yojana in Maharashtra)
'लोकसत्ता' या मराठी वृत्तपत्राने याबाबतचे सविस्तर वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार राज्यातील शिंदे सरकार लवकरच 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना लागू करण्याची शक्यता आहे. राज्यातील तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. अलिकडेच राज्य सरकारने शासकीय अधिकाऱ्यांचे एक पथक मध्य प्रदेशला पाठवले होते. या पथकाद्वारे मध्य प्रदेशमधील 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा अभ्यास करण्यात आला. ही योजना कशी राबवली जाते? त्यासाठी नेमके प्रारूप काय आहे? याचा या पथकाने अभ्यास केला आहे. त्यानंतर आता ही योजना महाराष्ट्रात प्रत्यक्ष लागू करण्यावर काम केले जात असल्याचे सांगितले जातेय. सूत्रांच्या माहितीनुसार यावेळच्या पावसाळी अधिवेशनात या योजनेची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.