Top 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 जून 2024 Top 25 28 June 2024

Continues below advertisement

अजित पवारांच्या बजेटमध्ये लोकप्रिय घोषणांची खैरात, मुंबई,ठाणे,नवी मुंबई महापालिका क्षेत्रात डिझेल २ रुपयांनी तर पेट्रोल ६५ पैशांनी स्वस्त होणार...

निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वीज बिल माफीची भेट,साडे सात हॉर्सपॉवरपर्यंतच्या ४६ लाख कृषी पंपांची वीज बिलं माफ...

मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत, ८ लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुलींना लाभ, मेडिकल,इंजिनियरिंग,कृषी अभ्यासक्रम मोफत शिकता येणार..

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची घोषणा,२१ ते ६० वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार, येत्या १ तारखेपासून अंमलबजावणी..

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा, प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत, ५२ लाख कुटुंबांना मिळणार लाभ...

पंढरपूर वारीचा वर्ल्ड हेरिटेजसाठी युनेस्कोला प्रस्ताव, मुख्य पालख्यांतील दिंडींना प्रति दिंडी २० हजार रूपये जाहीर, वारकऱ्यांना पालखी मार्गावर मोफत तपासणी, उपचार

आजचा अर्थसंकल्प म्हणजे थापांचा महापूर आणि आश्वासनांची अतिवृष्टी, उद्धव ठाकरेंची टीका. तर भूलथापांचा नाही मायबापांचा अर्थसंकल्प फडणवीसांचं प्रत्युत्तर...

आजचा अर्थसंकल्प म्हणजे लोकसभा पराभवाचं डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, जयंत पाटलांची टीका.. तर राज्यात नवा इतिहास तयार करणारा अर्थसंकल्प, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर..

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये अपघात झाला तेव्हा कारचा वेग ताशी ११० किमी होता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती, पुणे पोलीस आयुक्तांची भूमिका योग्यच, फडणवीसांकडून पाठराखण
((११०च्या स्पीडला अपघात-फडणवीस))

ड्रग्ज घेणारे,विकणारे कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा...बुलडोझर,पोकलेन आणि जेसीबी लावून ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करणार अशी ग्वाही...

विधानपरिषदेसाठी भाजपचे ५ पैकी २ उमेदवार जवळपास निश्चित, महादेव जानकर आणि पंकजा मुंडे विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता...

महाविकास आघाडी विधानपरिषदेची तिसरी 
जागा लढण्याच्या तयारीत, ठाकरे गटाकडून 
विनायक राऊतांचं नाव चर्चेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram