Kokan Refinery : रिफायनरीसाठी विदर्भ आणि कोकणात रस्सीखेच ? चर्चेतून काय उलघडणार? : ABP Majha
राज्यातल्या रिफायनरी प्रकल्पासाठी कोकण आणि विदर्भात रस्सीखेच सुरु झालीय. एकीकडे स्थानिकांच्या विरोधामुळे रखडलेल्या राजापुरातील रिफायनरीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी हिरवा कंदील दाखवल्याचं कळतंय. तर दुसरीकडे रिफायनरी तीन तुकड्यांत विभागून त्याचा एक भाग विदर्भातल्या एखाद्या जिल्ह्यात मिळावा म्हणून विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल म्हणजेच वेद संघटनेनं प्रयत्न सुरु केलेत. त्यामुळे रिफायनरीचं नेमकं काय होणार याची चर्चा सुरु झालीय.