WhatsApp And Facebook calling: व्हॉट्सअप आणि फेसबुकवरुन तुम्ही कॉल करत असाल तर ... : ABP Majha

Continues below advertisement


व्हॉट्सअप आणि फेसबुकवरुन तुम्ही कॉल करत असाल तर आता यापुढे या सेवेसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागू शकतात. मोदी सरकारने यासंदर्भात देशातील नागरिकांची मतं मागवलीत. हा निर्णय झाल्यास व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून कॉलिंग आणि मेसेजची सुविधा ही सेवा मानली जाईल, ज्याकरता या कंपन्यांना लायसन्स घ्यावं लागेल, पर्यायाने या सेवेकरता शुल्क अर्थात पैसे मोजावे लागतील. व्हॉट्सअप आणि फेसबुकसारख्या कंपन्या ग्राहकांना या सुविधा फुकट उपलब्ध करुन देत असल्याने आपल्याला नुकसान सोसावं लागतं, असा तक्रारीचा सूर टेलिकॉम कंपन्यांनी लावलाय. ज्यावर आता लोकांची मतं जाणून घेण्यासाठी सरकारने पावलं टाकलीत. २० ऑक्टोबरपर्यंत जनसामान्य यावर आपली मतं देऊ शकतात. नंतर हे विधेयक संसदेत मांडलं जाणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram