Ratnagiri : केरळ ट्रेनमध्ये आग लावल्याप्रकरणी आरोपी शाहरुख सैफीला रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर अटक

Continues below advertisement

केरळमच्या कोळीकोडमध्ये ट्रेनमधील ३ प्रवाशांना जाळल्याचा प्रकार गेल्या रविवारी घडला होता.. यामधील आरोपी शाहरुख सैफीला रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली. केरळ एटीएस आणि रत्नागिरी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. आरोपी मूळचा नोएडा येथील राहणारा आहे. अलप्पुळा-कन्नूूूर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करताना आरोपी शाहरुखनं पेट्रोल ओतून डबा पेटवून दिला.. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये एका २ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.. तीन दिवसांपासून केरळ एटीएस आरोपीचा शोध घेत होते.. त्याच्या मोबाईल लोकेशनवरून तो रत्नागिरीमध्ये असल्याचं कळलं. केरळ एटीएसनं रत्नागिरी पोलिसांना कळवलं, आणि मग शाहरुखला अटक करण्यात आली. केरळ पोलिसांचं पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी रत्नागिरीत दाखल झालीये. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram