Journalist : Shashikant Varishe यांच्या हत्येप्रकरणी मुंबईत पत्रकारांचं उद्या काळ्या फितींसह निदर्शन

Continues below advertisement

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि राज्यातील पत्रकारांवर दिवसेंदिवस होत असलेले हल्ले या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी उद्या शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी, २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता मुंबईतील पत्रकार काळ्या फिती लावून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मूक निदर्शने करणार आहेत. आज मुंबईतील पत्रकारांच्या विविध संघटनांची बैठक मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्ताहर कक्षात पार पडली. या बैठकीत मूक निदर्शन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram