Uday Samant : हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे, पाहा संपूर्ण राडा

रत्नागिरीत मंत्री उदय सामंतांना हिंदुत्ववादी संघटनांनी दाखवले काळे झेंडे.. वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनावरून आक्रमक..

उद्योग मंत्री उदय सामंतांना हिंदुत्ववादी संघटनांनी दाखवले काळे झेंडेे...

वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावरुन वाद...

रत्नागिरी मध्ये वख बोर्डाच्या कार्यालयाला विरोध ..

Ratnagiri Vidhan Sabha: उदय सामंतांना हरवण्यासाठी ठाकरे गट उमेदवार आयात करणार? रत्नागिरीत महत्त्वाची बैठक

रत्नागिरी: रत्नागिरी-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याविरोधात उमेदवार कोण? याचा शोध सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेतला जात आहे. याबाबत आज रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक होणार आहे. विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत उमेवारीबाबत चर्चा होणार आहे. सामंत यांच्याविरोधात दिला जाणारा उमेदवार हा पक्षातील आणि निष्ठावंत असावा असा सूर सध्या स्थानिक पातळीवर आहे. याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. तसेच इतर पक्षातील उमेदवार दाखल झाल्यास त्याला मिळणारी मदत कशी असेल? त्यावर स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं म्हणणं काय? यावर देखील या बैठकीत ऊहापोह होणार आहे. त्यामुळे आजची बैठक ही महत्त्वाची आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिघेजण इच्छुक होते. पण, एका इच्छुकानं आता माघार घेतली आहे. त्यामुळे आणखी दोन जण या स्पर्धेत अद्यापही कायम आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola