Ganpatipule त ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेलची फसवणूक, दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांना 17 हजारांना गंडा

रत्नागिरीतल्या गणपतीपुळे येथील ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेलमध्ये गेल्या काही दिवसापासून लोकांची फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत... आई कुठे काय करते मधली आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरांच्या पतीचीही फसवणूक झाल्याचं समोर आलंय,,, मधुराणी प्रभुलकर यांचे पती दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांना १७ हजारांना गंडा घातलाय... तर इतरांना लाखोंचा गंडा घातलाय. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी गणपतीपुळेला जाण्यासाठी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने हॉटेल बूक केले होते.  गणपतीपुळे येथील ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेल त्यांनी दोन दिवसासाठी १७ हजार रुपये देऊन बूक केले होते.दरम्यान हॉटेल व्यवस्थापनाकडून फसवणुक होत नसून हॉटेलची वेबसाईट हॅक झाल्याचं म्हंटलं आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola