बारसूमध्ये आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. अशातचआंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं. अखेर आंदोलकांना पोलिसांनी अडवलं आणि वातावरण निवळलं. माती परीक्षणाला जोरदार विरोध होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला. सध्या कोकणातल्या माळारानावर एका बाजूला विरोधक आणि दुसऱ्या बाजूला पोलीस आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्र आहे. बारसूतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित, सर्वेक्षण थांबलं नाही तर पुन्हा आंदोलन