Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा आज रत्नागिरीत, योगेश कदमांच्या मतदारसंघात सभा
शिवसेनेच्या कोकणातल्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ नेते रामदास कदम, त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रत्नागिरीत शिवसेनेसमोर आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे त्यांच्या निष्ठा यात्रेचा तिसरा टप्पा आज रत्नागिरीतून सुरु करत आहेत. सामंत आणि कदम यांच्या मतदारसंघात ते सभा घेणार आहे.
Tags :
Uday Samant Ratnagiri ABP Majha Aaditya Thackeray : Uddhav Thackeray Eknath Shinde Yogesh Kadam