'भाजपमध्ये जाणार नाही, काही लोकांनी अफवा पसरवली' : सचिन पायलट
Continues below advertisement
नवी दिल्ली: राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आल्यानंतर सचिन पायलट यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हटलं आहे. एबीपी न्यूजशी बोलताना सचिन पायलट म्हणाले की, मी भाजपमध्ये जाणार नाही, मी माझी रणनीति तयार करत आहे. काही लोकांनी मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या असल्याचं पायलट म्हणाले. दरम्यान आज, सचिन पायलट पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता आहे.
Continues below advertisement