Raj Thackeray's Letter to CM | नाणारला आमचा पाठिंबा, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर 'रत्नागिरी राजापूर रिफायनरी' सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला असं त्यांनी सांगितलं आहे. राज्याचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी असंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे.