ABP Majha Impact | 'एबीपी माझा'च्या मोहिमेला मोठं यश! ग्रंथालये सुरु करण्याबाबत आठवड्याभरात निर्णय
मुंबई : ग्रंथालयं सुरु करा म्हणून एबीपी माझानं सुरु केलेल्या मोहिमेला यश मिळालं आहे. लॉकडाऊनंतर ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात आठवडाभरात नोटीफिकेशन काढणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. वेगवेगळ्या ग्रंथालयांच्या विश्वस्तांनी आज कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीसंदर्भात राज ठाकरे यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी बातचित केली. यावेळी ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात आठवडाभरात नोटीफिकेशन काढणार असल्याचं उदय सामंत यांनी राज ठाकरे यांना सांगितलं आहे.
Tags :
Book Stores Book Stalls Marathi Live Updates Marathi News Channel Library Abp Majha Updates Uday Samant News Updates Abp Majha News Marathi News Supriya Sule ABP Majha LIVE Raj Thackeray Abp Majha Latest Marathi News