Home Minister on Fake TRP | रिपब्लिक चॅनलच्या प्रमुखांना बनावट TRPबद्दल विचारणा होणारच - अनिल देशमुख

Continues below advertisement

मुंबई : माध्यम क्षेत्रात खळबळ माजवणारी एक बातमी हाती आली आहे. मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे. या प्रकरणी 2 मराठी चॅनेलच्या मालकांना देखणी अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले आहे. रिपब्लिक टीव्हीची देखील यात चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

माध्यमांमध्ये टीआरपीला (TRP) अनन्यसाधारण महत्व आहे. काही माध्यमांनी एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंग मॅन्युप्युलेट केल्याचं समोर आलं आहे. अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या मालक आणि संचालकांविरोधात कारवाई करणार असल्याचे मुंबई पोलीस परमबीर सिंह यांनी सांगितले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram