Raigad Water Shortage : रायगडमधील 22 गावांवर पाणीटंचाईची टांगती तलवार
Continues below advertisement
महाड नगरपालिकेसह 22 गावांची तहान भागवणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेल्याने 22 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे . रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या या धरणावर अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या धरणात कमी प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.
Continues below advertisement