Uday Samant On Irshalwadi : उद्यापासून इर्शाळवाडीचं बचावकार्य थांबवणार- उदय सामंत
Continues below advertisement
इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या आता २९ झालीय. तर अजून ५२ ग्रामस्थ बेपत्ता आहेत. दरम्यान, पावसामुळे दरडी कोसळ्याची शक्यता असल्याने इतरांना इर्शाळवाडीत येण्यास मनाई करण्यात आलीय. स्थानिक प्रशासनाकडून इर्शाळवाडीत कलम १४४ लागू करण्यात आलंय. दरम्यान दरड दुर्घटनेतून वाचलेल्या ग्रामस्थांना धीर देऊन त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातंय..तसंच दरडग्रस्त नागरिकांना जवळच कंटेनरमध्ये स्थलांतरीत करण्यात येतंय.
एकूण ४१ परिवार आहेत..दरडग्रस्तांची येथे तात्पुरता राहण्याची सोय करण्यात येतेय..तर उद्या पासून रेस्क्यू ऑपरेशन बंद करण्यात येणार अशी माहिती उदय सामंत यांनी दिली
Continues below advertisement
Tags :
Family BAN Missing Rescue Operation Villagers Death Toll Section 144 Psychiatrist Local Administration Closure Guidance Due To Rain Udaya Samant Irshalwadi Darad Disaster