Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
गेल्या दशकभरापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून आज राज ठाकरे यांनी सरकारवरती निशाणा साधलाय. आज राज ठाकरे यांनी रायगडचा दौरा केला यावेळेला त्यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे. यानंतर मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था रखडलेली काम आणि दुसरीकडे कोकणामध्ये वेगाने सुरू असलेल्या विकासाच्या प्रकल्पांवरून राज ठाकरे यांनी काही सवालही उपस्थित केलेत. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यानंतर आणि त्यांनी केलेल्या टेकेच्या नंतर सत्ताधाऱ्यांकडून देखील आता पलटवार करण्यात आला. बघूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट. आता हे राजकीय आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवले तर महामार्ग अजूनही रखडलेलाच आहे आणि इथून प्रवास करणाऱ्यांना गेली अनेक वर्ष जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय ही वस्तुस्थिती आहे. गणेशोत्सव जवळ आलाय त्यामुळे पुढचा महिनाभर महामार्ग का रखडला तो कधी पूर्ण होणार आणि या रस्त्यावरचे खड्डे या बातम्या आम्ही सालाबाद प्रमाणे देऊ. पण हा महामार्ग पूर्ण झाला अशी घोषणा सरकार कधी करणार हे विघ्नहरतात जाणे..