Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

आपल्या घरात सकाळचा चहा असो किंवा मग सणासुदीला तयार होणारे गोड पदार्थ असो. दूध आणि साखर या दोन्ही गोष्टी आपल्या रोजच्या गरजेच्या [संगीत] वस्तू आहेत. मात्र एकाच आठवड्यात या दोन्ही वस्तू महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कातरी लागणार आहे. गाईच्या दुधाच्या दरात दोन रुपये आणि म्हशीच्या दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ होणार आहे. तर दुग्धजन्य पदार्थांचे दरही तब्बल 10 टक्क्यानी वाढणार आहे. दुधाचे हे नवे दर येत्या 11 ऑगस्ट पासून लागू होतील. ट्रान्सपोर्ट आणि पाऊस पॅकिंग मटेरियल वाढलेला आहे. मागच्या एक महिन्यामध्ये दुधाच्या दूध खरेदीमध्ये दोन रुपयाची दरवाढ झालेली आहे. ही दरवाढ खरंतर हे जे आता पॅकिंग मटेरियल 30%ने वाढून गेलं डिझेल किंवा दूध खरेदी प्रामुख्याने दूध खरेदी वाढली. मागच्या काळामध्ये काही चांगल्या गोष्टी झाल्या पनीरवर अनालॉग चीजवर बंदी आली मग दुधाची आमच्या ओरिजनल पनीरचीही मागणी वाढली. त्यासाठी शेतकऱ्यांनाही आम्हाला दुधाचा दर वाढून दिला पाहिजेल आहे कारण शेतकऱ्यापर्यंत हा पैसा गेला पाहिजेल आहे. त्यामुळं दूध खरेदी दरातली जी होणारी वाढ आहे त्या वाढीमुळे आम्हाला ही पुढची वाढ करावी लागेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola