Raigad Police Bharti : भरतीला आलेल्या तिघांकडे सापडली उत्तेजक द्रव्य, गोळ्या
रायगड जिल्ह्यातल्या २७२ जागांसाठी तीन जानेवारीपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेतल्या तीन उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य आणि गोळ्या आढळून आल्यामुळं खळबळ उडाली आहे. या तिघांपैकी दोन तरुण पुणे जिल्ह्यातील, तर तिसरा तरुण अहमदनगरमधला असल्याची माहिती आहे. वरसोली आणि नाईकआळी येथील कॉटेजमध्ये वास्तव्यास असलेल्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य आणि गोळ्या असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणांना ताब्यात घेतलं.