Raigad Irshalwadi Rescue Operation : स्थानिक प्रशासनाकडून इर्शाळवाडीत कलम 144 लागू
इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या आता २७ झालीय. तर अजून ५३ ग्रामस्थ बेपत्ता आहेत. दरम्यान, पावसामुळे दरडी कोसळ्याची शक्यता असल्याने इतरांना इर्शाळवाडीत येण्यास मनाई करण्यात आलीय. स्थानिक प्रशासनाकडून इर्शाळवाडीत कलम १४४ लागू करण्यात आलंय. ४८ पैकी १७ घरं गाडली गेलीत. दरम्यान दरड दुर्घटनेत वाचलेले ग्रामस्थ आजही घाबरलेल्या स्थितीत आहेत. त्यांना मानसोपचारतज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातंय.