Raigad Irshalgad Landslide : इर्शाळवाडीत पुन्हा बचावकार्याला सुरुवात; पाऊस, चिखल, धुक्याचं आव्हान
Continues below advertisement
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामधील इर्शाळवाडीवर काल दु:खाचा डोंगर कोसळला. आणि दिवसभरात १६ मृतदेह काढण्यात आले. अजूनही १०० हून अधिक ग्रामस्थ ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त केली जातेय. काल मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. त्यानतंर आज सकाळपासूनच बचावकार्याला सुरूवात करण्यात आलीय. काल दिवसभरात 103 लोकांना ढिगगाऱ्याखालून काढण्यात यश आलं. विशेष म्हणजे इर्शाळवाडी, माथेरान परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. या पावसातच दरड कोसळून इर्शाळवाडीतली ४८ पैकी १७ घरं गाडली गेली. तर वीसेक घरांचं खूप नुकसान झालंय.
Continues below advertisement
Tags :
Raigad Landslide Irshalwadi Landslide Raigad Irshalgad Landslide Khalapur Irshalgad Landslide Khalapur Landslide Landslide In Maharashtra