ABP News

Raigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूस

Continues below advertisement

महायुतीमध्ये सुरू असलेल्या धुसफूस संदर्भातील बातमी..नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाहीय.. अशात आता शिंदेंच्या आमदारांशिवायच रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडल्याची माहिती आहे..रायगडचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीनं या बैठकीला उपस्थित राहिल्याची माहिती आहे.. दरम्यान भरत गोगावले रायगडडावर तर , महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे शिंदेंचे आमदार रायगडमध्येे असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांशिवायच रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडल्यानं राजकीय वर्तुळात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नाराजीची चर्चा सुरू आहे..  नाशिक, रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत म्हणून केवळ मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावलेलं, रायगडचे मंत्री म्हणून आदिती तटकरे आणि भरत गोगावलेंना निमंत्रण, मात्र गोगावले बैठकीला गैरहजर,अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram