
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 10 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 10 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याचं आज प्रयागराज कुंभमेळ्यात पवित्र स्नान, संगमातील पवित्र स्नानानंतर अक्षयवट आणि हनुमान मंदिरातही घेणार दर्शन
प्रयागराज महाकुंभमेळ्यात भाविकांच्या श्रद्धेचा महापूर, रविवारच्या सुटीचा मुहूर्त साधत तब्बल दीड कोटी भाविकाचं पवित्र स्नान..
पंतप्रधान मोदी आज विद्यार्थ्यांसोबत करणार परीक्षा पे चर्चा, बोर्डाचे परीक्षार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांसोबत पंतप्रधानांचा थेट संवाद, पाच कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी
पंतप्रधान मोदी आज फ्रान्सच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर, एआय अॅक्शन समिटमध्ये भूषवणार सहअध्यक्षपद, फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोंसोबत द्वीपक्षीय चर्चा, महत्वपूर्ण संरक्षण करार होण्याचीही शक्यता
दिल्लीचा मुख्यमंत्री ठरवायला वेळ लागणार, सूत्रांची माहिती, पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यानंतरच ठरु शकतो दिल्लीचा मुख्यमंत्री
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा राजीनामा मंजूर, राज्यपालांकडून विधानसभा अधिवेशन स्थगित, याच अधिवेशनात मांडला जाणार होता अविश्वास ठराव, संसदेतही मणिपूरचे पडसाद उमटण्याची शक्यता
३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान, गडचिरोलीला लागून असलेल्या बिजापूरच्या जंगलात चकमक, दोन जवान शहीद..