Khalapur Irshalgad Landslide : बचावकार्याला सुरुवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळाकडे रवाना

Khalapur Irshalgad Landslide : महाराष्ट्राची आजची पहाट अत्यंत दुखद बातमीनं झालीये. रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल होत आहेत. दरम्यान, घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोहोण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर असलेलं धुकं बाधा ठरतंय. तसेच पावसामुळे डोंगराचा रस्ता अत्यंत निसरडा झाल्यामुळं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.  

अंधार आणि पावसामुळे माती निसरडी झाल्यानं वाडीपर्यंत पोहोचण्यास मदत पथकाला खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. सकाळी उजेडात मदत आणि बचावकार्य जोमानं सुरु केलं जाणार आहे. सध्या 25 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून 4 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अद्याप 100 जण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola