Irshalwadi Landslide : सहा मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा 22 वर गेलाय, 86 जण बेपत्ता

Continues below advertisement

रायगडमधील इर्शाळवाडीतील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेला तीन दिवस झालेत. काल दिवसभरात सहा मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा २२ वर गेलाय. दरम्यान, अजून ८६ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय. बुधवारी रात्री दु:खाचा डोंगर कोसळून इर्शाळवाडी होत्याची नव्हती झाली. ४८ पैकी १७ घरे गाडली गेलीत. बचावकार्य गुरुवार सकाळपासूनच सुरू झालंय. पण मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येतायंत. शिवाय पावसामुळे दरडी कोसळ्याची शक्यता असल्याने काल इर्शालवाडीतून एनडीआरएफचे जवान वगळता सर्वाना वर येण्यास मनाई करण्यात आलीय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram