Ganesh Chaturthi | बाप्पाच्या आगमनाची लगबग, Pen च्या बाजारात गणेश भक्तांची मोठी गर्दी
चतुर्थी आणि गणपती बाप्पाची उद्या प्राणप्रतिष्ठा होईल. गणेश उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. उद्या लाडक्या बाप्पाचं आगमन होतंय. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सध्या गणेश भक्तांची लगबग बघायला मिळतेय. पेण शहरासह आजूबाजूच्या बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी अगदी सकाळपासून मोठी गर्दी झाली आहे. इथला आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला. गणपती बाप्पाचं प्रतिष्ठापन झाल्यानंतर कोकणामध्ये हा उत्सव मोठ्या पद्धतीनं साजरा होताना पाहायला मिळतो. उद्याच्या याच उत्सवाची तयारी आणि याच उत्सवाला लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी सध्या पेणच्या मार्केटमध्ये मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते. गणेश भक्तांनी खरेदीसाठी सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी केली आहे.