Mahad MIDC Blast : महाडच्या MIDCमध्ये काल ब्लूजेट कंपनीत मोठा स्फोट, 7 कामगारांचा मृत्यू : ABP Majha
महाडच्या MIDCमध्ये काल ब्लूजेट कंपनीत मोठा स्फोट झाला. यामध्ये अडकलेल्या ११ कामगारांपैकी ७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर चार कामगार अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरु आहे. कंपनीच्या गेटबाहेर बेपत्ता कामगारांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहायला मिळाला.
कंपनी व्यवस्थापन आणि पोलीस नीट माहिती देत नसल्याचा आरोप हे कुटुंबीयांनी केलाय. काल सकाळी साडे दहाच्या सुमाराला कंपनीत भीषण स्फोट झाला. यामुळे भीषण आग लागली, जी नियंत्रणात आणण्यात अनेक तास लागले. या कंपनीला उत्पादनाची परवानगीच नव्हती, तरीही इथं काम सुरू होतं असा आरोप स्थानिकांनी केला. तर पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळाची पाहणी केलीय