Aaditya Thackeray on Irshalwadi : आदित्य ठाकरे इर्शाळगडाच्या पायथ्याशी,घटनेवर दिली पहिली प्रतिक्रिया
Khalapur Irshalwadi Landslide : महाराष्ट्राची आजची सकाळ हादरवणाऱ्या दुर्घटनेनं झाली. रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री दुखाचा डोंगर कोसळला. इर्शाळवाडीवर दरड कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 80 जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलं आहे. तर शंभरहून अधिक जण बेपत्ता आहेत.
इर्शाळवाडीवर कोसळलेल्या दरडीखाली अंदाजे 40 घरं दबल्याचा अंदाज आहे. तर अंदाजे 250 ची वस्ती आहे. या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचताना दम लागल्यानं मृत्यू झाला आहे. तसेच मदतकार्यात सहभागी झालेल्या ट्रेकरचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे तसेच स्थानिक आमदार महेश बालदी तातडीनं दुर्घटनास्थळी दाखल झाले. शिवाय एनडीआरएफची टीमही दुर्घटनास्थळी दाखल झाली. पाऊस आणि अंधारामुळे सुरुवातीला मदतकार्यात अडथळे येत होते. मात्र, उजाडल्यानंतर मदतकार्याला वेग आला आहे.