Pune Khadakwasla Dam | पुण्याचं खडकवासला धरण तुडुंब, पाणी पाहण्यासाठी धरण परिसरात पुणेकरांची गर्दी

Continues below advertisement

पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं जवळ जवळ शंभर टक्के भरली आहेत. खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. जवळपास दहा हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान आज रविवार सुट्टीचा दिवस असून खडकवासला धरण हा पुणेकरांसाठी पिकनिक स्पॉट आहे. त्यामुळे खडकवासला धरणाचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. नागरिकांनी धरण परिसरात गर्दी करू नये यासाठी त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram