Pandharpur Protest | उद्या प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात पंढरपुरात आंदोलन, प्रशासनाची काय तयारी?
सोलापूर : पंढरपुरात वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलनाची संभाव्य गर्दी पाहता पोलिसांमार्फत खबरदारी घेतली जात आहे. पंढरपूरच्या सर्व सीमा आणि विठ्ठल मंदीर परिसरात मोठा फौजफाटा पोलिसांमार्फत तैनात करण्यात आला आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर लोखंडी बॅरेकेडिंग लावण्यात आले आहेत. उद्या रात्रीपर्य़ंत जवळपास 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा पंढरपुरात तैनात असणार आहे. विशेष म्हणजे आदोलकांची मोठी संख्या जिल्ह्याभरान येणार असल्याचा अंदाज असल्याने पंढरपूरकडे येणारी एसटी वाहतूक सेवा बंद करण्याचा प्रस्ताव पोलिसांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता, तो त्यांनी स्वीकारला आहे.