Yugendra Pawar Baramati Lok Sabha : दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, युगेंद्र पवार काय म्हणाले?
बारामतीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या कन्या रेवती सुळे यादेखील आता प्रचारात उतरल्या आहेत. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार हे आहेत. दोघेही बारामती शहरात पदयात्रा काढत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करीत आहेत.पदयात्रा सुरू असताना युगेंद्र पवार यांच्याशी बातचीत