Pune Crime | राधाकृष्ण सोसायटीत तरुणीचा मृतदेह आढळला | पुणे | ABP Majha

पुण्यात सिंहगड रोड परिसरात माणिकबाग इथल्या एका सोसायटीत तरुणीचा मृतदेह आढळलाय. तेजसा श्यामराव पायाळ असं या तरुणीचं नाव असून ती राधाकृष्ण सोसायटीमध्ये राहत होती. मूळची बीडची असलेल्या तेजसाने एमबीएचं शिक्षण घेतलं होतं. ती हिंजवडी इथल्या एका कंपनीत कामाला होती. काही दिवसांपूर्वी ती आई वडिलांसोबत गावाला गेली होती. चार-पाच दिवसांपूर्वी ती पुण्यात परतली. मात्र त्यानंतर तेजसाचा फोन लागत नव्हता. तिची आई परतली असता तिला घरात मृतदेह आढळला. मृतदेहाशेजारी दारुच्या बाटल्याही आढळल्यात. तेजसाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola