Mumbai AC Local I तिन्ही मार्गांवर आता गारेगार प्रवास I एबीपी माझा
मध्य रेल्वे मार्गावर येणारी पहिली वातानुकूलित लोकल तिच्या अधिक उंचीमुळे केवळ ट्रान्स हार्बर मार्गावर चालवण्यात येणार होती. परंतु, उंचीचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. मध्य रेल्वे मार्गावर 10 दिवसांत दाखल होणारे लोकलची उंची 4.270 मीटर असेल. त्यामुळे ही लोकल मुख्य, ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावरही धावू शकेल. त्यामुळे या मार्गावर प्रवाशांचा प्रवासही आता गारेगार होणार आहे.