Building Collapse Pune : पिंपरी चिंचवडमधल्या वाकड परिसराती इमारत जमीनदोस्त होणार? : ABP Majha

पिंपरी चिंचवडमध्ये चालू बांधकामाची इमारत एका बाजूला अचानकपणे झुकल्याचं पाहायला मिळतंय..  सध्या इमारतीला खालून सपोर्ट देण्यात आलाय. मात्र ही इमारत जमीनदोस्त करावी लागण्याची दाट शक्यता आहे. कारण वाकडमधली ही इमारत कधीही कोसळू शकते, अशी भीती स्थानिकांना आहे. पालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. बांधकाम वाय पद्धतीचं म्हणजेच चार ऐवजी दोन पिलरवर उभारण्यात आल्यानं अशी परिस्थिती उद्भवल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलंय...तूर्तास इमारत पोकलेनच्या साह्यानं सरळ करण्याचे प्रयत्न करण्यात आले, तसंच खालून सपोर्ट ही देण्यात आलाय. रात्री हे कामकाज थांबवण्यात आलं असून आज महापालिकेत इमारत जमीनदोस्त करण्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola