Pune : नवऱ्यानं न विचारता पाणीपुरी आणल्यानं विषारी औषध प्राशन करुन पत्नीची आत्महत्या
पुणे : नवरा-बायको म्हटलं की थोडाफार रुसवा-फुगवा, वाद-विवाद अनेकांमध्ये होत असतात. मात्र, हा वाद विकोपाला गेला तर काय होऊ शकते? याची प्रचिती पुण्यात आली आहे. पुण्यात नवऱ्याने न विचारता पाणीपुरी आणल्याने नवरा बायकोत तब्बल तीन दिवस वाद सुरू होता. अखेर बायकोने या वादानंतर विषारी रसायन पिऊन आत्महत्या केली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. प्रतिक्षा गहिनीनाथ सरवदे (वय 23) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती गहिनीनाथ सरवदे (वय 33) याला पोलीसांनी अटक केली आहे.