PUNE : नवले पुलावरच्या अपघातांना ब्रेक कधी? नवले पूल का बनतोय पुणेकरांच्या मृत्यूचा सापळा?

Pune Accident : पुणे- बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या एका अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नऱ्हे गाव परिसरातील सेल्फी पॉइंटजवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. थिनर वाहतूक करणाऱ्या टँकरने समोर चाललेल्या सतरा सीटर टेंपो ट्रॅव्हलरला कट मारण्याच्या नादात धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 12 जण जखमी झाल्याचं समजतेय. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजेतय. त्यामुळे या दुर्देवी अपघातील मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola