Diesel नं शंभरी गाठल्यानं आधीच आर्थिक संकटात असलेल्या ST महामंडळासमोर नवं आव्हान

Continues below advertisement

ST Mahamandal BUS Employee :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेने काल थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला आहे. तर दुसरीकडे 17 संघटनांचा सहभाग असलेल्या संयुक्त कृती समितीनं एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भत्ते व थकबाकी द्या,अन्यथा बेमुदत उपोषण करु असा इशारा सरकारला दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचे, नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी देण्यासंदर्भात एसटी प्रशासनाकडे एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने 27 ऑक्टोबर रोजी राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram