WEB EXCLUSIVE | घरातला कचरा घरातच, पुण्यातील पाटील कुटंबियांचं 'झिरो वेस्ट घर'
हिरव्याखाली झाडांच्या सावलीने आच्छादलेल्या या घराच पाटील कुटूंब..! या घराचं वैशिष्टय म्हणजे प्लॅस्टिक सोडलं तर बाकी कुठलाच कचरा या घरातून बाहेर येत नाही. डाॅ साधना पाटील आणि प्राध्यापक पांडूरंग पाटील यांनी गेल्या २४ वर्षांपासून निसर्गाशी जास्तीत जास्त जवळीक साधणारी जीवनशैली आत्मसात केली आहे. त्यांनी घराला ‘झिरो वेस्ट घर’ बनवलं आहे. कारण प्लॅस्टिक वगळता बाकी सगळ्या कचरा घरातच जिरवला जातो आणि त्यापासुन खताची निर्मिती केली जाते आणि याच खतापासून त्यांनी घराला स्वयंपुर्ण बनवणारी बाग बनवली आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कचऱ्याचं वर्गीकरण असल्याचं साधना पाटील यांनी सांगितलं. ओला कचरा आणि प्लॅस्टिकचा कचरा वेगळाच असावा याची कटाक्षाने काळजी घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.