Pune Water Shortage : पुण्यातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार, पाणी जपून वापरा पालिकेचं आवाहन
पुण्यातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. पर्वती उपकेंद्रात देखभाल दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी, १ सप्टेंबरला सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळं नागरिकांनी जपून पाणी वापरावं, असं आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय.