ABP News

Vasant More on Brij Bhushan Sharan Singh:Raj Thackeray यांना रोखणारे ब्रिजभूषण सिंह Pune येथे येणार

Continues below advertisement

Vasant More on Brij Bhushan Sharan Singh : ब्रिजभूषण सिंह पुण्यात येणार, महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना ब्रिजभूषण सिंह यांच्या हस्ते लावण्यात येणार आहे. त्यानिमित्त आगामी काही दिवसात पुणे शहरात येणार आहेत.. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं होतं.. आता मनसे ब्रिजभूषण सिंग यांना कोणताही विरोध करणार नाही.. खुद्द राज ठाकरे यांनीच या संदर्भातले आदेश दिले असल्याचे मनसे नेते वसंत मोरे यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी यासंदर्भातील भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.. अन्यथा आम्ही त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू दिला नसता असं देखील वसंत मोरे यांनी सांगितले. दरम्यान ब्रिजभूषण सिंह हे भाजपचे खासदार असल्याने मनसेवर भाजपचा दबाव आहे का असा प्रश्न विचारला असता वसंत मोरे म्हणाले.. आम्ही कोणत्याही पक्षाच्या दबावाखाली येणारे नाहीत.. वेळोवेळी झालेल्या आंदोलनातून आम्ही हे दाखवून दिलं आहे.. अनेक मंत्र्यांचे कॉलेजेस, टोलनाके फोडून आम्ही खळखट्याक आंदोलन केला आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram