Uddhav Thackrey Pune : राज्यातील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackrey Pune : राज्यातील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार
हेही वाचा :
मुंबई पोलीस दलातून निलंबीत केलेले अधिकारी सचिन वाझे (Sachin vaze) याने महाराष्ट्राच्या राजकारण ढवळून निघेल असा बॉम्ब टाकला. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सचिन वाझे याने गंभीर आरोप केले. सचिन वाझेने आरोप केल्यानंतर तासाभरातच अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझेचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच सचिन वाझे हा गुन्हेगार आहे. ही व्यक्ती विश्वास ठेवण्यालायक नाही असं हायकोर्टाने म्हटल्याचा दाखला देखील त्यांनी या वेळी दिला. ते नागपुरात बोलत होते.
अनिल देशमुख म्हणाले, सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील वाझेबद्दल बोलताना वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे, असे म्हटले होते. दोन खुनाचा त्यांच्यावर गुन्हा आहे. त्यामुळे सचिन वाझेच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं देखील हायकोर्ट म्हणाले होते. सचिन वाझे याला हाताशी धरुन फडणवीस माझ्यावर आरोप करत आहेत.