NCP MP Amol Kolhe : पवार साहेबांचा आशीर्वाद डोक्यावर आहे, म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर : अमोल कोल्हे
Continues below advertisement
सध्या महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सर्वकाही ठीक नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अशी वक्तव्ये करण्यात आघाडीवर आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पवार साहेबांचा आशीर्वाद डोक्यावर आहे, म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर असल्याचं मोठं विधान खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. नाशिक महामार्गावरील खेड घाट व नारायणगाव बायपासच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे याचे काय पडसाद उमटतात तो येणारा काळच ठरवेल. मात्र, या वक्तव्यामागे स्थानिक राजकारण असल्याचे बोलले जात आहे.
Continues below advertisement