pune : पुण्यात भरदिवसा रस्त्यावर दोन गटात तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल
Pune : पुण्यात भरदिवसा रस्त्यावर दोन गटात तुफान राडा झाल्याचा एक व्हीडिओ समोर आलाय. येरवडा इथल्या शिवाजी चौक रस्त्यावर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली. जागेच्या वादातून हा प्रकार घडल्याचं समजतंय. हाणामारी करणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. येरवड्यात भर रस्त्यात गुन्हेगारांची हाणामारी बराच वेळ सुरू होती. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय.