Pune Oxyugen Shortage : पुण्यातील योग रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा,ऑक्सिजनअभावी तीन रुग्णांचा मृत्यू?

राज्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू लागल्यानंतर त्याचा संबंधित आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होणार अशी भिती वर्तवली जात होती. ती भिती आता खरी होताना दिसत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर, बेड्स यांचा तुटवडा राज्यात अनेक ठिकाणी निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. 

या पार्श्वभूमीवर आता ऑक्सिजनचा तुटवडा पुण्यात देखील जाणवू लागल्याची एक घटना समोर आली आहे. ऑक्सिजनअभावी पुण्यातील योग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ही माहिती हॉस्पिटलमधील डॉक्टर अभिजीत दरक यांनीच दिल्यामुळे ऑक्सिजन तुटवड्याचे भीषण वास्तव आता समोर येऊ लागले आहे. दरम्याना, गेल्या २ दिवसांपासून रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे देखील डॉ. अभिजीत दरक यांनी सांगितले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola