Pune Bomb: रेल्वे स्टेशनवरील संशयास्पद वस्तू स्फोटक नाही ABP Majha
Continues below advertisement
पुणे रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ खबरदारी म्हणून रिकामं करण्यात आलं. तसंच पुण्याकडे येणाऱ्या गाड्याही थांबवण्यात आल्या. घटनेची वर्दी मिळताच बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी पोहोचलंं. या पथकाकडून या संशयास्पद वस्तूची पाहणी करण्यात आली. तब्बल तासाभराच्या तपासणीनंतर ही वस्तू बॉम्ब नसल्याचा दावा पोलिसांनी केला. पुणे रेल्वे स्थानकावर कोणतेही डेटोनेटर किंवा स्फोटके आढळले नाहीत अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ पुन्हा एकदा रहदारीसाठी खुले करण्यात आले असून रेल्वे वाहतूकही पूर्ववत सुरु झालीय. त्यामुळे पुणेकरांसह रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
Continues below advertisement